प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव -
टाकळी बायपास रोडवर अंबिका हॉटेलजवळ आज दुपारी टाटा कंटेनर व दुचाकी अपघातात पस्तीस वर्षीय अंगणवाडी कार्यकर्ता महिला ठार झाली असून दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२१ डिसें २०२५ रोजी दुपारी १.२५ वाजेच्या सुमारास टाटा कंटेनर क्रमांक एम.एच. ४६ सी.एल. ४०३० व बजाज प्लॅटिना मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५ ई.एम. १९१२ यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकी चालक तुषार भाऊसाहेब पानगव्हाणे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला गंगा ऊर्फ गायत्री हेमंत घायाळ (वय ३५, रा. पाबळवाडी, ता. निफाड) हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. किशोर पवार हे पुढील तपास करीत आहेत.
.jpg)
Post a Comment
0 Comments