क्रीडांगणाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष..!
बारामती: झारगडवाडी ग्रामपंचायती मार्फत १५ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या निधीतून गावातील क्रीडांगण परिसरात नागरिकांसाठी चालण्याचा ट्रेक उभारण्यात आला होता. मात्र अवघ्या काही काळातच या ट्रेकसह संपूर्ण क्रीडांगण परिसराची दुरवस्था झाली आहे. क्रीडांगणाच्या भोवती मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली असून परिसर पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत आहे.
ट्रेक खचला असुन, साचलेली घाण आणि वाढलेली झुडपे यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. सकाळ-संध्याकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तब्बल ५ ते ७ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या सुविधेची कोणतीही देखभाल करण्यात आलेली दिसत नाही.
इतका मोठा सार्वजनिक निधी खर्च होऊनही गुणवत्तेअभावी व देखरेखीअभावी ही सुविधा वापरात येऊ शकलेली नाही. वारंवार नागरिकांकडून क्रीडांगण परिसर स्वच्छ करणेबाबत सांगण्यात आले परंतु ग्रामपंचायत कडुन दुर्लक्ष केले गेलेले आहे.ग्रामपंचायत प्रशासनाकडून सदर परिसराची व ट्रेकची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments