Type Here to Get Search Results !

दानशूर व्यक्तिमत्त्व पार्वतीबाई गावडे यांचे निधन; अंगणवाडीसाठी दिली होती स्वतःची जमीन




गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी 

​बिरोबावाडी:येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक श्री. बाळासाहेब गावडे सर यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई बबन गावडे यांचे सोमवारी (दि. २२) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने बिरोबावाडी परिसरात मोठी शोककळा पसरली असून, एका दानशूर व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला असल्याची भावना व्यक्त होत आहे.​श्रीमती पार्वतीबाई गावडे या अतिशय साध्या आणि परोपकारी वृत्तीच्या होत्या. गावडे-कोकरेवस्ती परीसरात कोणीच जागा देण्यास तयार नसताना. गावातील लहान मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी आपली स्वतःची एक गुंठे जमीन अंगणवाडीसाठी विनामूल्य बक्षिस दिली होती.त्यांच्या या दातृत्वामुळेच गावात अंगणवाडीची इमारत उभी राहू शकली.​त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बिरोबावाडीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल समस्त ग्रामस्थ बिरोबावाडी यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments