Type Here to Get Search Results !

शिवरे ता.निफाड च्या शिक्षकांनी बनविलेला "स्पेलिंग बी वर्ड बँक’ व लोगोचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब यांच्या हस्ते अनावरण



प्रतिनिधी :. गणेश ठाकरे, लासलगाव 

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकारजी पवार साहेब यांचे वेगवेगळी उपक्रम सध्या चर्चेचे विषय होत आहे.  दिव्यांग बांधव यांचा सन्मान असेल,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान असेल, सहल , जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत भोजन अशा नि अनेक चांगले प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. 

त्याच बरोबर जिल्हा परिषद नाशिक व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्याच्या उद्देशाने ‘स्पेलिंग बी’ हा अभिनव उपक्रम सन २०२३ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक शैक्षणिक दिशा देण्यासाठी आणि शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी रचना करण्याच्या हेतूने यंदाच्या वर्षी होणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेसाठी जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून ‘स्पेलिंग बी वर्ड बँक’ तयार करण्यात आली असून या वर्ड बँकचे व स्पेलिंग बी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण आज करण्यात आले, या वर्ड बँकेत इयत्ता पहिली ते आठवीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांमधील शब्दांचे गटनिहाय संकलन करण्यात आले असून, ते अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे.


याच कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरे ता. निफाड येथील शिक्षक प्रदीप देवरे यांनी तयार केलेल्या ‘स्पेलिंग बी’ उपक्रमाच्या अधिकृत लोगोचे अनावरण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या अनावरण प्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप, संतोष झोले, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच पी.एम.श्री शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments