गाव :- कामपूर
रोजी कामपूर गावात लुपिन ह्युमन वेल्फेअर & रिसर्च फाउंडेशन शिंदखेडा पियू अंतर्गत धुळे जिल्हा व्यवस्थापक श्री सुनिल सैंदाणे साहेब व जिल्हा समन्वयक जितेंद्र गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रशिक्षक श्री कुशावर्त पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली व सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला व त्या शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रातील त्यांचे स्वतःचे अनुभव व्यक्त केले.
व त्यानंतर शिंदखेडा पियु व्यवस्थापक प्राची कोठावदे मॅडम यांनी संस्थेची प्रास्ताविक मांडली व कामपूर गावाचे सरपंच विष्णू पाटील सर यांनी शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. व्ही. एस गिरासे सर यांनी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध पिकांबाबत मार्गदर्शन केले तसेच लुपिन फाउंडेशन संस्थेचे जिल्हा प्रशिक्षक मा. श्री. कुशावर्त पाटील सर यांनी संस्थेविषयी व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली व यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांची यशोगाथा सांगितली. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी मित्र माधुरी मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन कृषी मित्र प्रविण पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित कृषि सहाय्यक प्रशांत बागल, पत्रकार सुरेश पाटील,गावातील सरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व महिला शेतकरी व शेतकरी वर्ग, कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीय शेतकरी दिवस निमित्ताने परसबाग साठी भेंडी बियाण्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला कृषी मित्र विनोद पवार , प्रवीण राजपूत, मोहन नगराळे ,नितीन कोळी, शरद पाटील, रोशनी पाटील, सुजाता पाटील,योगेश कुवर , पाहुबा धनगर , संदीप माळी , निकिता मोरे, प्रतिभा पाटील, यांचे अनमोल सहकार्य लाभले एकूणच कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

Post a Comment
0 Comments