राहुल चव्हाण @बारामती
अंजनगाव ता. बारामती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत केलेल्या स्वच्छता कामाची दखल घेत बारामतीचे गटविकास अधिकारी श्री. किशोर माने साहेब यांनी पाहणी केली. या अभियान अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत गावाठाण व रानमळा येथील स्मशानभूमी परिसरात वड, पिंपळ, चिंच, जांभुळ इत्यादी झाडे लावुन वृक्षारोपण कार्यक्रम गटविकास अधिकारी माने साहेब यांचे हस्ते झाडे लावुन राबविणेत आला. त्यानंतर गावातील स्वच्छता केलेला परिसर तसेच ग्रामपंचायत ऑफीस, प्राथमिक शाळा, अंगणवाडी या ठिकाणी भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली व योजनांची माहिती दिली.
अंजनगाव येथील नेचर क्लब गावात गेली तीन महिन्यापासुन प्रत्येक रविवारी एक दिवस गावासाठी हा उपक्रम राबवित आहे. क्लबच्या माध्यमातुन गावातील प्राथमिक शाळा, हायस्कुल मैदान, मंदीर आवार स्मशानभूमी तसेच गावातील मोकळा परिसर स्वच्छ केला जात आहे. क्लबचे युवा सदस्य हे स्वच्छतेचे काम मनापासुन व गावाचे ऋण मानुन करीत आहेत. यामुळे गावातील व वाड्यावस्त्यातील परिसर, प्राचीन मंदिरे, रस्ते स्वच्छ व सुंदर दिसत आहेत.
अंजनगाव ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभागी असल्याने आपले गावाचा नंबर यावा याच दिशेने काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील युवा व ग्रामस्थ उत्स्फुर्सपणे काम करीत आहे असे मत सरपंच सौ. वंदना गणेश परकाळे व उपसरपंच सौ. शोभा जालिंदर वायसे यांनी व्यक्त केले.
यावेळी नेचर क्लबचे नवनाथ परकाळे, मंगशे वायसे, सुर्यकांत मोरे, मिलिंद मोरे, जालिंदर वायसे, बापुराव सस्ते, वायसे मामा, मोहन चव्हाण, राहुल परकाळे, नेमाजी वायसे, दत्तु वायसे, प्रशांत कुचेकर, विजय परकाळे, दादा सस्ते, धनंजय वायसे, राजु वायसे, विनोद मोरे, हनुमंत पवार, लाला कुचेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे नेचर क्लब मार्फत आभार मानले.

Post a Comment
0 Comments