अरुणोदयी वाजती मंदिरी घंटानांद
होई तृप्त मन जागवी मंगलपहाट
मंजुळ वाणीतूनी कानी ऐकू येई
चिमणपाखरांचा सुमधुर चिवचिववाट...!
भल्या पहाटे बाप जाई शेतावरी
करण्या झाडलोट गुरां चारापाणी
माय शिंपडे सडा सुगंधी अंगणी
करी तुलसाईस नमन जल अर्पूणी...!
हंबरुनी गाई कुरवाळीती वासरा
आभाळापरी मायेचा लावूनी लळा
भरूनी येई ऊर ओलवी नेत्र
पाहुनिया नयनरम्य प्रेमसोहळा...!
गावी वाहे हृदयी जन-माणसा
माया ममता माणुसकीचे झरे
जात-पात विसरूनी भेद सारे
जन नांदती आनंदे सौख्यभरे...!
अत्तराहुनी सुगंधी गावाकडची माती
देई धडे जपण्या संस्कृतीचा वसा
स्नेहबंधाचा टिळा लावूनी कपाळी
वसे हृदयी सदा प्रेम-अमृताचा ठसा..!
जगाया देई बळ जपण्या नातीगोती
अत्तराहूनी सुगंधी माझ्या गावाकडची माती....!
श्री विनोद शेनफड जाधव
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
Post a Comment
0 Comments