देशमाने गावात माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन, प्रात्याक्षिक शेतीसाठी माती परीक्षण हे अत्यंत आवश्यक असून, त्याबाबतचे मार्गदर्शन देशमाने (ता. येवला) येथे कृषीदूत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
कृषी.महाविद्यालय बाभूळगाव येथील अंतिम वर्षाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी- कृषीदुत सुयश मुदगुल ,अनिकेत निमसे राकेश पवार,प्रज्वल थेरे,विशाल भवर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. डी. पी. कुळधर सर, उपप्राचार्य डॉ.एस. डी. म्हस्के सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहम सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशमाने गावात माती परीक्षणाचे प्रात्याक्षिक सादर केले.
त्यासाठी लागणाऱ्या पद्धती गावकऱ्यांना समजावून सांगितल्या. तसेच या ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी गावातील विविध शेतांमधून मातीचे नमुने घेतले. हे नमुने पुढील घटकांसाठी तपासण्यात आले: मातीचा प्रकार (काळी, जांभूळ, रेतीमिश्रित), पी.एच. मूल्य, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, तसेच नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावले. त्यानुसार पीक आराखडा व खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले.
या माहिती बद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास विशाल दुघड,वैभव जगताप आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments