प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
नैताळे (ता.निफाड) येथील १३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.याबाबत समाधान विठ्ठल बोरगुडे (वय ३५, धंदा शेती, रा. नैताळे, ता.निफाड यांनी पोलिसांना खबर दिली आहे. दि.२१ डिसें रोजी सायंकाळी सहा वाजेपूर्वी मुखेड ता.येवला येथील ओम दिनानाथ गुरुकुलजवळील विहिरीत सार्थक संजय बोरगुडे (वय १३) हा पडला. विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद येवला ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ७९/२०२५ नुसार भारतीय नागरिक व सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आर. एन. पाटील करीत आहेत.

Post a Comment
0 Comments