प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
नासिक येथील माळी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल महिरावणी या शाळेने 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवलेला होता. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील अनेक शाळांचा सहभाग असताना न्यू इंग्लिश स्कूल महिरावणी शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी हवा प्रदूषण नियंत्रण या विषयावरती प्रतिकृती सादर केली या प्रतिकृतीसाठी श्लोक संदीप महाले व आदेश अशोक दाते या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन तालुकास्तरीय प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला.
याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीमती मंदाकिनी देवकर विस्तार अधिकारी श्री. भाऊसाहेब जगताप, दिलीप पवार, मोहन रणदिवे, केंद्रप्रमुख विलास पाटील व तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष दादाजी अहिरे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
या वेळी विध्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका सोनाली जोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार, सचिव डॉ. शितल पवार व मुख्याध्यापक नारायण शिंदे व शाळेतील सर्व शिक्षिका यांनी यशस्वीतांचे कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments