रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील तापीनदी बॅकवॉटर परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती निंभोरा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे निंभोरा पोलिसांनी दिनांक
9जानेवारी 2026 रोजी 8 वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैध रित्या गावठी हातभट्टीची दारू गाळतांना संबंधित इसम नामे संजय विश्वनाथ तायडे वय 52 वर्षे रा. गोलवाडा ता.रावेर हा इसम मिळून आला.सदर ठिकाणी सुमारे 300 लिटर कच्चे रसायन तसेच 30 लिटर गावठी दारू व तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे व दारू गाळण्याचे अंदाजे 36000रुपये किमतीचे साहित्य मिळून आले.तसेच मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून सदरील गावठी दारू निर्मिती हातभट्टी फोडून पूर्णतः नष्ट करण्यात आली असून.सदर इसमाविरुध्द निंभोरा पोलिस स्टेशनला पो.काॅ परेश ईश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्याद वरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.तसेच पोलीस अधीक्षक, डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये व फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई निंभोरा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पो.ह.सुरेश अढायगे,पो काॅ. महेंद्र महाजन,पो.काॅ.परेश सोनवणे या पथकाने केली आहे.
तसेच हातभट्टी गावठी दारू मुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या गैरकृत्यांविरुध्द पोलिस प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments