Type Here to Get Search Results !

राशन दुकानातून निक्रृष्ठ ज्वारी वाटप



गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी: - 

मागील दोन महिने पासून डोणगाव गोदाम वर निक्रृष्ठ धान्य वाटप होत होते याला मुक संमती गोदाम पालक व पुरवठा विभागाची असल्याने राशन कार्ड धारकांना निक्रृष्ठ धान्य वाटप करण्यात येत होते यावर कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती व धान्य माल गोदामवरून परत पाठविण्यात आला होता. लवकरच चांगला राशनचा माल देण्यात येईल सांगण्यात आले होते पण महीना उलटल्यानंतर पुरवठा विभागाने ज्वारी डोणगाव गोदामवर पाठविली परंतु सदर ज्वारी ही निक्रृष्ठ असून त्यात सर्व बोडया व धुळ आहे सदर जानेवारी चा माल हा फेब्रुवारी ला वाटण्यात येत आहे तोही निक्रृष्ठ दर्जोचा माल असून गोरगरीबाच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा आहे त्यामुळे निक्रृष्ठ दर्जोचा माल उतरवून घेणारे गोदाम पालक व सदर मालाचे निरीक्षण करणारे पुरवठा निरीक्षक यांच्या वर कारवाई करावी व सर्व सामान्य राशकार्ड धारकांना परत या महीन्याचा चांगल्या प्रतीचे ज्वारी व तांदूळ त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राशन कार्ड धारकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments