Type Here to Get Search Results !

डोणगाव येथे ठीक ठिकाणी श्रीच्या प्रगट दिनानिमित्त महाप्रसाद वाटप


गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी: - 

दि. ८फेब्रुवारीला शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त डोणगाव येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला स्थानिक पोलीस स्टेशन शेजारी श्री संत गजानन महाराज नाका ग्रुप च्या वतीने संत गजानन याच्या मुर्तीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आरती करुन ७क्विटल पिठले पोळी व शिरा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .

यावेळी हजारो भाविक भक्तांनी शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला तर स्थानिक श्रीराम मठ येथे ही श्रीसंत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त जय श्रीराम मठ मित्र मंडळ व गावकरी यांच्या वतीने ६ क्विंटल पोळी भाजी व शिरा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर स्थानिक गजानन महाराज मंदिर येथे ही महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यामुळे डोणगाव येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments