गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी
येथील वार्ड क्रमांक १ सिद्धार्थ नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने ‘त्यागमूर्ती’ माता रमाई यांची जयंती अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. दीन-दलितांच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाई यांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास मा. अरुण धांडे, राज वाठोरे , निलेश सदावर्ते, संदीप बोरकर, रोहित वाघमारे, संदीप वाकोडे, पवन खोडके, उज्वल साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला मंडळातील आशाबाई सदावर्ते, लक्ष्मीबाई दिपके, सविता गवई, जयश्री ताई गवई, अर्चना साळवे, रंजना पनाड, आशाबाई भारशंकर यांच्यासह महिला व बालकांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती.
कार्यक्रमात माता रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी माता रमाईंच्या आदर्श विचारांना प्रेरणा मानून सामाजिक कार्यात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments