Type Here to Get Search Results !

रुईच्या दोन लेकींची भरारी 'ज्ञानयात्री'द्वारे थेट दिल्लीवारी; 'विमान प्रवासा'चे स्वप्न होणार साकार



प्रतिनिधी  गणेश ठाकरे लासलगाव 

    जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हास्तरावर चमकलेल्या नाशिक जिल्ह्यातील १६ गुणवंत विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेच्या विशेष 'ज्ञानयात्री' या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. यामध्ये रुई येथील जिल्हा परिषद शाळेच्या अनन्या जाधव हिने 'स्पेलिंग बी' स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा,तर संस्कृती चव्हाणके हिने 'मॅथ बी' स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या विशेष संकल्पनेतून १६ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ही सहल आयोजित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय,संसद भवन,राष्ट्रपती भवन,लाल किल्ला,जुनी दिल्ली आणि इंडिया गेट यांसारख्या लोकशाही आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या केंद्रांना भेट देऊन हे विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेणार आहेत.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विजया थेटे यांनी विशेष कौतुक केले आहे.या विद्यार्थिनींना शालेय पातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत घडवण्यासाठी शिक्षक रतन शेळके, ज्ञानेश्वर सालपुरे,सोपान गंभिरे,कमल गंभिरे,प्रकाश नारद,भालचंद्र गायकवाड आणि ज्योती कडवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केदारनाथ रोटे,सरपंच सरला पवार आणि उपसरपंच सविता तासकर यांनी अभिनंदन केले आहे. निलेश रोटे,राजेंद्र तासकर, बाबासाहेब पोटे, केदारनाथ तासकर,रवी आहेर,अण्णासाहेब गायकवाड,दिनकर खंडागळे,कृष्णा कणसे,सरस्वती तासकर, पंकज वाघ,भागवत वाघ,संपत रोटे, नामदेव गायकवाड,योगेश पोटे,रोटे सर, माडदेव सर यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी या दोन्ही विद्यार्थिनींचे मनापासून अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी दिल्लीवारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments