Type Here to Get Search Results !

पाटोदा येथे झुआरी फार्महब लिमिटेड, जय किसान जंक्शन अंतर्गत सर्व रोग निदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 



प्रतिनिधी  = गणेश ठाकरे लासलगाव 

 पाटोदा ता.येवला येथे शेतकऱ्यांसाठी नेहमीच अग्रेसर असणारी झुआरी फार्महब लिमिटेड जय किसान जंक्शन विविध खतांच्या माध्यमातून सेवा देत असते. जगाचा पोशिंदा आरोग्य संपन्न असावा, शेतकऱ्याची आरोग्याची काळजी साठी कंपनीने सर्व रोगनिदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात रक्त,लघवी, बीपी, मधुमेह, हिमोग्लोबिन, इसीजी थायरॉईड, सीबीसी एच आय व्ही, युपीटी, एसटीएम, इत्यादी प्रकाराची करण्यात आले.यावेळी ११९ शेतकरी लाभार्थी यांनी तपासणी करून घेतली. या शिबिरासाठी पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकिता चिरडे, डॉ. निकिता मोहिते डॉ.मयूर पवार व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

 तसेच या. उपक्रमासाठी समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तसेच या उपक्रमासाठी मार्गदर्शक लाभलेले जोतिबा जाधव स्टेट हेड, नवीन पाटील नाशिक एरिया मॅनेजर, नकुल कापडी व प्रज्वल शिंदे यांच्या सहकार्यामुळे हे आरोग्य शिबीर यशस्वी रित्या पार पडले


Post a Comment

0 Comments