Type Here to Get Search Results !

झारगडवाडी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा



राहुल चव्हाण -प्रतिनिधी 

बारामती :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झारगडवाडी येथे १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीविषयी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगून शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रगती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात लाटे सर,बालगुडे सर, बालगुडे मॅडम, जाधव मॅडम, भोसले मॅडम तसेच नाळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांद्वारे व घोषणांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. संपूर्ण परिसरात उत्साह, अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना अनुभवायला मिळाली.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्याविषयी प्रेम, आदर आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली.


Tags

Post a Comment

0 Comments