Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांच्या पाठपुरवठ्याला यश वनविभाग कर्मचारी बिबट्याच्या शोधात



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

शेतकऱ्यांनी बिबट्याला मोठ्या कौशल्याने शेतशिवारातील एका गोठ्यात बंदीस्त केले होते पण वन विभागाच्या चमुला तेथे वेळेवर पोहचून कारवाई करता आली नाही. *नंतर प्रतिक पाटील नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली शंभर शेतकरी महागाव फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यालयावर धडकले. प्रतीक पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुसद येथून रेस्क्यू टीम तातडीने महागांव शिवारात पाठवली*. गोठ्यातून उडी मारून पळालेला बिबट्या सध्या ज्वारीच्या शेतात लपून बसला आहे.

Post a Comment

0 Comments