अहिल्यानगर प्रतिनिधी –
अहिल्यानगर तालुक्यातील सोनेवाडी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन व फलकाशी अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हरिचंद्र दळवी सर उपस्थित होते. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर तसेच भारतीय संविधानाच्या महत्त्वावर बहुमूल्य मार्गदर्शन केले.
यावेळी सोनेवाडी गावातील मान्यवर नेते मा. श्री सुरेशराव सुंभे पाटील, विद्यमान सरपंच श्री विठ्ठलराव दळवी, चेअरमन श्री अरुण दळवी पाटील, संभाजी ब्रिगेडचे गोरखराव दळवी पाटील तसेच श्री झुंबरराव कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments