Type Here to Get Search Results !

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

 



उपनिबंधक बारी यांच्या लॉकर मधून रोख रक्कम सोन्या चांदीचे ( सोन्याचे बिस्किट ) दागिने असे एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार रुपये जमा.   

यावल दि.२३ ( सुरेश पाटील )

लोकसेवक तथा जळगाव तालुका सहकारी संस्था उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांचे भुसावळ शहरात लॉकर असल्याची माहिती मिळाल्याने लॉकर मधून सोन्याचा हार, बांगड्या व सोन्याचे बिस्किट असा एकूण ९९ लाख ४ हजार ९६० तसेच ८ लाख ३६ हजार ५०० रुपयाची रोख रक्कम आणि २६२५ रुपयाची चांदीचे दागिने असा एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी जमा केली. या कौतुकास्पद कारवाईने नाशिक विभागातील सहकारी संस्था कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली यातील जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोण कोण सेवानिवृत्त होणार होते आणि त्यांच्यासाठी मोठी रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते का.? अशी सुद्धा सहकार क्षेत्रात चर्चा आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव तालुका उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी रा. शांतीनगर,यावल रोड,भुसावळ यांच्यावर २० मे २०२६ रोजी यशस्वी सापळा कारवाई झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदरच्या गुन्ह्यात त्यांना मा. न्यायालयाने दि.२३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या घर झडती दरम्यान त्याचे भुसावळ येथील कॉसमॉस बँक मधे लॉकर असल्याची माहिती मिळाली असता सदर लॉकरची दोन पंतांचा समक्ष जळती घेतली असता त्यामध्ये १) ९९,०४,९६०/- रू. कि. ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगडया व सोन्याचे बिस्किट, ( २ ) ८,३६,५०० /- रोख रक्कम त्यात सर्व ५००/- रू दराच्या नोटा, (३) २६२५/- रू. किं. चे १०.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकुण ०१,०७,४४,०७५/- रु. किंमतीचे

सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम मिळुन आला असुन सदरचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम जमा करण्यात आली आहे.

झडतीची कारवाई मा.भारत तांगडे,पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक मा.माधव रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र,नाशिक.मा.सुनील दोरगे,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र,नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लूचपत प्रतिबंधक विभाग जळगाव श्री. योगेश ठाकूर,ला.प्र.वि.जळगांव पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगीता पवार प्रदीप मनोज पाटील अमोल सूर्यवंशी चंद्रशेखर चौधरी  या लॉकर झडती पथकाने केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही शासकीय कार्यालयात भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर काम करून घेण्यासाठी कोणीही पैसे / लाच मागणी करीत असेल आणि त्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांचा दूरध्वनी क्रमांक ०२५७ २२३५४७७ ( मोबाइल क्रमांक ७५८८६६१०६४ असा आहे.)


Post a Comment

0 Comments