Type Here to Get Search Results !

हदगाव शहरातील पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न



*गुरुवर्य राजकीय सामाजिक क्षेत्रासह भक्त मंडळीची उपस्थिती* 


*प्रविण कुंटे उमरखेड तालुका प्रतिनिधी 

शहरातील हदगाव महादेव मंदिराचे गुरुवर्य शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हदगांव शहरात मंगळवार, १९ मे ते २१ मे असे तीन दिवस अधिक मासानिमीत्य पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त दररोज सकाळी श्री शिवयोगी बसवलिंग महास्वामीजी यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक, शिवपाठ, विश्वशांती रुद्रयाग स्वाहाकार, नंतर श्री. महादेव मंदिर ते कार्यक्रम स्थळ हदगांव शहरांतील कस्तुरी मंगल कार्यालय रुद्रकलश मिरवणूक सपन्न झाली. त्यानंतर ग्रंथराज परमरहस्य पारायण व महाप्रसाद संपन्न झाला.

गुरुवार, दि. २१ मे रोजी उज्जैन नगरीतील श्रीमद जगदगुरु श्री. श्री. श्री. सिध्दलिंगराजदेशिकेद्रं शिवाचार्य महास्वामीजीचे जल्लोषात मिरवणूकीने हत्तीवरुन मिरवणूकीने स्वागत करण्यात आले. यावेळेस वेदांताचार्य शिवाचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा, महंत गोपाल गिर महाराज, गुरु बाल व्यकटस्वामी महाराज पिंपळगाव, गुरु दिगांबर शिवाचार्य महाराज वसमत, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज चिल्लरगी, रुद्रमणी शिवाचार्य महाराज मुदखेड, भंदत दयानंद महाथेरु मेळावा,

गुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज देवणी, गुरु प्रभुलिंग शिवाचार्य महाराज शिरड शहापुर, गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, प.पु. योगीराज महाराज हदगांव, विरागोदासजी महाराज शिवपुरी, गुरु गंगेश्वर महाराज, गुरु मुक्तीनाथ महाराज, गुरु माहेश्वरी टाकराळा, गुरु गजानन महाराज आर्णी, गुरु मन्ना महाराज नांदेड, गुरु लक्ष्मण महाराज हंगरगेकर गुरु बंडु बाबा वांरगा महानुभाव पंथासह आजुबाजुच्या जिल्ह्यातील गुरुवर्याच्या उपस्थितीत शहरातुन मिरवणूकीनंतर धर्मसभेत गुरुवर्यांनी आपापले विचार व्यक्त करीत शिवचैतन्य शिवाचार्य कार्याचे कौतुक व्यक्त केले. या महाराजांच्या सोहळ्यानिमीत्य आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महादेव मंदिराला तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्तीसह विविध कार्यासाठी

आवश्यक सभागृहासह मंगल कार्यालयास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या सोहळ्यानिमीत्य नांदेड माजी महापौर शैलेजा किशोर स्वामी, उमरखेड आमदार किशनराव बानखेडे, नगराध्यक्षा रोहिणीताई भास्कर वानखेडे निधीताई नितीन भुतडा उमरखेड कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मंडळीची उपस्थिती लावली. महाप्रसादाचा लाभघेतला. सोहळा यशस्वीतेसाठी तालुक्यासह हदगांव परीसरातील तालुक्यातील भक्त सेवेकरी मंडळीनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. सुत्रसंचलन संदेश चोंढेकर, प्रा. डॉ. साईनाथ चंदापुरे यांनी केले तर आभार श्रीकृष्ण मंदिराचे गुरुवर्य योगीराज महाराज यांनी केले.



Post a Comment

0 Comments