खोटा ठराव करून निधी हडपण्याचा प्रयत्न; जिल्हाधिकाऱ्यांकडे नितीन नरवाडे यांची फौजदारी कारवाईची मागणी
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव / यवतमाळ: महागांव नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १० मधील दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, नितीन विजयराव नरवाडे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात संबंधित लिपिक, अभियंता, मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मुद्दे:
जागा बदलून काम: सन २०२३-२४ मधील मंजूर कामे नियमानुसार ठरलेल्या ठिकाणी न करता, संगनमताने इतर ठिकाणी करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप.
फसवणूक: काम पूर्ण झाल्याचे भासवून खोटाठराव मंजूर करून घेतला आणि देयक (Bill) काढण्याचा प्रयत्न केला.
मागण्या: प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कामाचे देयक तात्काळ स्थगित करावे आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाकडेही पाठवण्यात आल्या असून, प्रशासकीय वर्तुळात या तक्रारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment
0 Comments