Type Here to Get Search Results !

*उत्रोली जवळ दुचाकीवर विज कोसळून तरूणाचा जागीच मृत्यू



*भोर तालुका प्रतिनिधी नरेंद्र यादव*

दि.२२ सायंकाळी भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथील रहिवासी. शंकर किसन काटेकर वय २२. यांचा अंगावर उत्रोली रस्त्यावरील परीट मळाजवळ दुचाकीवरून येत  असताना  वीज कोसळून अकाली मृत्यू झाला आहे.तसेच या घटनेत सागर शांताराम पवार. वय २५ रा.भोर, व चंद्रकांत गणपत वाघमारे, वय २६ रा. वडगाव हे दोघ गंभीर जखमी असुन. अनिल रवी घोगरेकर वय १५, रा. वडगाव,हा किरकोळ जखमी आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 निसर्गाच्या या भयानक घटनेमुळे काटेकर कुटुंबाचा मुख्य आधार हिरावला गेला असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नायब तहसीलदारांनी रूग्णालयात भेट देत शासन मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments