Type Here to Get Search Results !

गीताई फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपावी:-सलीम मुजावर



कराड : समाजातील गरजू,वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या “गिताई फाउंडेशन”या सामाजिक संस्थेला नुकतेच अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.हा सोहळा कराड येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

यावेळी रोटरी विभागीय अधिकारी सलीम मुजावर यांच्या हस्ते व कराड न्यूज चे संपादक दशरथ पवार,कराड अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन पालकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात बोलताना सलीम मुजावर शेठ म्हणाले

आजच्या काळात समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या संस्थांची गरज मोठ्या प्रमाणात आहे.गिताई फाउंडेशनने समाजातील शिक्षण,

आरोग्य,महिला सक्षमीकरण,युवक मार्गदर्शन आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्य करावे.अशा संस्थांमध्ये समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे ताकद असते.यावेळी संपादक दशरथ यांनीही आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचे स्वागत केले.“सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य गिताई फाउंडेशन निश्चितच प्रभावीपणे करेल.समाजहिताचे उपक्रम राबविताना माध्यमांचे सहकार्य नेहमीच राहील,असे ते म्हणाले.

गिताई फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी,महिला,शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.आगामी काळात आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धन,रक्तदान शिबिरे,युवकांसाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक जनजागृती अभियान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमास सुखशांती सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख मार्गदर्शक शेखर सर,सचिव जीवन गंगावणे,खजिनदार अजित सगरे,उपअध्यक्ष संग्राम रैनाक,सुप्रिया शिंदे, स्नेहल चव्हाण,व विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्येंद्र जाधव यांनी केले तर आभार सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वासराव निकम यांनी मानले.


Post a Comment

0 Comments