Type Here to Get Search Results !

राफ्टा फुटला… गाव बुडालं!” — बाळदी* *ग्रामपंचायतीचा कारभार उघड; वर्षातच राफ्ट्याची वाट लागली



*प्रविण कुंटे उमरखेड  प्रतिनिधी 

बाळदी : ग्रामपंचायतीत उभारलेला सिमेंट रस्ता नव्हे, तर ‘राफ्टा’च असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवघ्या वर्षभरात राफ्टा खचून भगदाडांनी भरला असून, फुटलेल्या राफ्टामुळे गटारीचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. परिणामी गल्लोगल्ली चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

स्थानिकांच्या मते, हा राफ्टा (ड्रेनेज व्यवस्था) निकृष्ट दर्जात बांधला गेला. तो तुटल्याने संपूर्ण गावातील पाण्याचा निचरा कोलमडला आणि सिमेंट राफ्ट्याचे अस्तित्वच संपले.

 सिमेंट, वाळू, खडीचे प्रमाण, क्युरिंग आणि तांत्रिक निकष यांची उघडपणे पायमल्ली झाल्यानेच ही दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

“पाच वर्षांत नेमकं केलं काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. सार्वजनिक निधीचा हा उघड अपव्यय असून, जबाबदार कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी तीव्र झाली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून राफ्टा दुरुस्त करावा, संपूर्ण निचरा व्यवस्था सुरळीत करावी आणि राफ्ट्याचे पुनर्बांधकाम करावे; अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.



Post a Comment

0 Comments