प्रवीण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड : विडूळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेची यशाची परंपरा कायम राखत एनएमएमएसमध्ये तब्बल दहा मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या. यामध्ये सानवी बद्रीनाथ सगमे ने १५१ गुण मिळवित जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच आस्था चिरडे, श्रुती शेटेवार, दक्षता वारकड, श्रावणी आरळे, अंकिता आलमे, सोनल वाघमारे, श्रद्धा हरण, श्रेया आकले, श्रावणी पहुकर या मुली एनएमएमएस जिल्हा मेरिटमध्ये आल्या. यवतमाळ जिल्हा परिषदचा महत्त्वाकांक्षी उपक्रम महादीपमध्ये यश मिळवून राशी कुंटे, आस्था चिरडे, सानवी सगमे यांनी विमानवारी केली. सानवी सगमे हिने सलग चार वर्षे विमानवारी केली. त्यामध्ये तिने दिल्ली, आग्रा, हिमाचल प्रदेश, म्हैसूर, बेंगलोर, फत्तेपूर सिक्री आदी ठिकाणांचा अभ्यास दौरा केला. महादीप आणि एनएमएमएसमध्ये यश प्राप्त केलेल्या सर्व मुलींचे वर्गशिक्षक शरद थोरकर, मुख्याध्यापक बाळासाहेब सरसमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल इंगोले, उपाध्यक्षा प्रियंका धुळे, सर्व सदस्य, शिक्षकवृंदांनी कौतुक केले.

Post a Comment
0 Comments