दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक काढले असून राज्यातील विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर कर्ज माफीची फसवी घोषणा करण्यात येणार असल्याचे लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून आज दिनांक 5 जून 2026 रोजी जिल्हाध्यक्ष डी.के.दामोधर यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत निवेदन देऊन यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या शर्ती अटी न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली.
याचे कारण असे की, महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेला जिल्हा म्हणून यवतमाळ ओळख आहे.महाराष्ट्रातील पहिला शेतकऱ्याचा बळी यवतमाळ जिल्ह्यातून गेला असून आज पर्यंत सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरिता हे शासन कुचकामी ठरले असून जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले सततच्या नापीकी मुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशा मेटा कुटीला आला आहे.
अशातच यवतमाळ जिल्ह्याला पिक विम्यातून वगळून येथील शेतकऱ्यांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रति स्थानिक प्रस्थापित नेत्यांचा नाकर्तेपणा दिसून आला आहे राज्याचे मुख्यमंत्री हे विरोधी बाकावर असताना शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम त्यांच्या मनात आजही कायम असेलच यात शंका नाही परंतु मायबाप सरकार म्हणून आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन कुठल्याही प्रकारच्या अटी-शर्ती न लावता विशेष बाब म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन जिल्ह्याला पिक विमा लागू करावा अन्यथा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष डी.के दामोधर यांनी दिला आहे

Post a Comment
0 Comments