Type Here to Get Search Results !

गोरक्षक स्व .गजानन सुरोशे यांच्या कुटुंबाला वर्धमान संस्कार धाम ट्रस्टकडून १५ लाखांची मदत!



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

गोरक्षक स्वर्गीय गजानन मारुती सुरोशे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम ट्रस्ट ही पहिली संस्था धावून आली असून संस्थेच्या वतीने सुरोशे कुटुंबाला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

संस्थेचे प्रतिनिधी जे. पी. मेहता आणि जितूभाई शहा यांनी वडद येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरोशे कुटुंबीयांची विचारपूस केली व मदतीचा धनादेश सुपूर्द केला. या मदतीमुळे सुरोशे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून परिसरात संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

यावेळी बजरंग दलाचे तालुका संयोजक महेश सुरोशे, जिल्हा संयोजक वैष्णवजी ढोकणे, विश्व हिंदू परिषदेचे मनोजजी सरव्वाया, गोपालकृष्ण गोशाळेचे संस्थापक सदस्य अनिलजी पांडे यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते आदित्य डाखोरे, सोनू पाटील भिमटे, तसेच विश्व हिंदू परिषदेचे ओम हाटेले व अॅड. संभाजीराव कवाने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय गजानन सुरोशे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याचे आवाहन केले. वर्धमान संस्कार धाम ट्रस्टने दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल उपस्थितांनी संस्थेचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments