प्रतिनिधी :. गणेश ठाकरे लासलगाव :
सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसीतर्फे दि. ३ जून ते १२ जून २०२६ दरम्यान नाशिक येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात जिल्हा व मुंबई विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात चित्रकला, ड्रिल, वक्तृत्व, कथाकथन आणि सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले. सांस्कृतिक स्पर्धेत कॅडेट शौर्या निरगुडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही विविध स्पर्धा व कार्यक्रमांत उल्लेखनीय यश संपादन केले.
या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण, संघभावना आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित झाली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर एम. एस. किरुएला, एसएम साहेब , ट्रेनिंग इंचार्ज सुभेदार गावडे आणि धात्रक बाबूजी धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा नीताताई पाटील, सचिव संजय पाटील, संचालक मंडळ, प्राचार्य विजय वाणी, मुख्याध्यापिका केदार मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना विद्यालयाचे एनसीसी प्रमुख प्रमोद पवार आणि क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचा गौरव वाढविला.

Post a Comment
0 Comments