Type Here to Get Search Results !

संजय नागरगोजे यांचा निर्भीड युवा ग्रामीण पत्रकार संघ भारत तर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरव



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

निर्भीड युवा ग्रामीण पत्रकार संघ भारत यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक ५ जून २०२६ रोजी माहूर येथे भव्य उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप, धर्मभूषण परमपूज्य श्री साईनाथ महाराज वसमतकर तसेच निर्भीड युवा ग्रामीण पत्रकार संघ भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची उपस्थिती लाभली.

यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. दैनिक महासागरचे महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे यांना त्यांच्या निर्भीड, निष्पक्ष आणि समाजहिताच्या पत्रकारितेबद्दल "उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२६" प्रदान करून गौरविण्यात आले.

संजय नागरगोजे यांनी आपल्या लेखणीतून विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. निर्भीड पत्रकारिता, रोखठोक मांडणी आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकनाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत निर्भीड युवा ग्रामीण पत्रकार संघ भारततर्फे त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे, राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि श्री साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संजय नागरगोजे यांनी हा सन्मान आपल्या वाचकांचा, सहकाऱ्यांचा आणि पत्रकारितेतील मूल्यांचा असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून समाजाभिमुख आणि जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.


Post a Comment

0 Comments