Type Here to Get Search Results !

वेळापूर येथे भव्य मर्दानी खेळ व स्व संरक्षण शिबिराचा उत्साहात समारोप



प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव 

वेळापूर येथे शिवजयंती उत्सव समिती, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत वेळापूर, शिवप्रताप मित्र मंडळ व प्रतापशिव बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य मर्दानी खेळ व स्व संरक्षण शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. 

प्रथम दीपप्रज्वलन होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन शस्त्र पूजन करण्यात आले.शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष केदु श्रीपत शिंदे तर प्रमुख पाहुणे  सुवर्णाताई जगताप (संचालक लासलगाव बाजार समिती), प्रकाश शेठ दायमा (उपाध्यक्ष नाशिक मर्चंट बँक) किशोरजी जावरे साहेब (अधिक्षक जिल्हा व सत्र न्यायालय निफाड),अँड नरेंद्र राणा, सोमनाथ आरोटे (उपप्राचार्य NVP कॉलेज) उपस्थित होते. 

 गुरुकुलचे आचार्य लखन गुरुजी यांनी उपस्थितांना दूरदृश्य प्रणाली च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. व मुलांनी पालकांचे पाद्य पूजन केले.युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पारंपरिक मर्दानी खेळ, लाठी-काठी, तलवारबाजीची प्रात्यक्षिके तसेच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले.

शिबिरादरम्यान  प्रशिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेचा वारसा जपत युवकांमध्ये धैर्य, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि संघभावना निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली .

    कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी युवक-युवतींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अँड  नरेंद्र राणा यांनी मनोगतात मर्दानी खेळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.तसेच शिबिरार्थी मुले व पालकांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमात ऋतुजा  संतोष शिंदे (डॉक्टर) व राहुल जगताप (मुंबई पोलिस) यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी केदू विठ्ठल शिंदे,विशाल पालवे, ऐश्वर्या जगताप, प्रताप आढाव साहेबराव शिंदे, ग्रामस्थ, पालक आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिस्तबद्ध नियोजन आणि उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिराचा समारोप संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड केशव शिंदे यांनी तर सूत्रसंचालन सचिन शेलार व अँड शुभांगी शिंदे यांनी केले. आभार गणेश ठाकरे यांनी मांडले. 

 शिबिरात एकूण ४० मुली व 35 मुले  सहभाग.

शिबिरात शिकविलेले उपक्रम  सूर्यनमस्कार,भूमी नमस्कार व्यायाम,लाठीकाठी,दांडपट्टा ,भाला ,पट्टा,तलवार,लाठी,कुऱ्हाड, बाणा इ.प्रकाराचे खेळ शिकवलेत्याचबरोबर चिंतन वर्गकराटे प्रशिक्षणलव्ह जिहाद, शूर मावळे यांचे बॅनर विशेष लक्ष केंद्रित करत होते.प्रशिक्षक.स्नेहा झुरे,धनश्री अतिग्रे,अनु झुरे,स्वाती ताई सव्यसाची गुरुकुलम वेंगलुर कोल्हापूर येथील होते.


Post a Comment

0 Comments